। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बंद घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातील 83,000/-रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने असा ऐवज लंपास केल्याची घटना तालुक्यातील वेश्वी येथे घडली आहे. अलिबाग पोलीस ठाणे हद्दीतील घर क्र.681 वेश्वी ता.अलिबाग या घरात 24 रोजी 10:30 ते दि. 25 मे 2022 रोजी 10:30 वा च्या दरम्यान ही घटना घडली. अज्ञात चोरटयाने बंद घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडुन त्यावाटे आत प्रवेश केला. आणि घरातील एकूण 83 हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने असा ऐवज लंपास केला. या घरफोडीच्या घटनेबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.क. 380,454,457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.कावळे हे करीत आहेत.





