अलिबाग तालुक्यातील घरफोड्या उघडकीस

चौघांच्या टोळीला अलिबाग पोलीसांनी केले जेरबंद

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यासह जिल्ह्यात वाढत्या घरफोड्या आणि चोर्‍यांच्या घटनांमुळे रायगड पोलिसांची झोप उडाली होती. त्यामुळे या गुन्ह्यांच्या घटना उघडकीस आणण्याचे आव्हान पोलिसांवर होते. त्यानुसार अलिबाग तालुक्यातील सात ठिकाणच्या वेगवेगळ्या घटनांमधील चौघांच्या टोळीला जेरबंद करण्यात अलिबाग पोलिसांना यश आले आहे. या चौघांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असून आणखी गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता पोलिस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम आणि पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गेल्या एक ते दीड महीन्यांपासुन अलिबाग शहर व परीसरात घरफोडयांचे सत्र चालु झाले होते. 26 ते 28 ऑगस्ट दरम्यान रेवस बायपास रोडलगत कुष्ण संगम सोसायटी मधील गाळा नंबर 2 मध्ये असलेले फायनान्स कंपनीचे कार्यालय, तसेच गाळा नंबर 3 मध्ये ओम साई मोटर्स व आदर्श बिअरशॉपी विद्यानगर येथील दुकानाचे लोखंडी शटर उपकवुन घरफोडी करून किंमती मालाची चोरी केली होती. त्याचप्रमाणे 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान शिवम भगश घरत यांच्या वाडगाव फाटा येथील घरत कलेक्शन या दुकानाचे शटर अज्ञात चोरटयानी उपकवुन दुकानाताल नविन शर्ट, पॅन्ट, ट्रॅकपॅन्टची चोरी केली होती. याच दरम्यान खडताळपुल बामणोली येथील हनुमान मंदीर व थळ गावचे टेकडीवरील दत्त मंदीरात घरफोडया चोर्‍या करून मंदीरातील दान पेटया लांबविल्या होत्या. तसेच 07 ते 08 ऑक्टोबर दरम्यान कुरूळ येथील करण हार्डवेअर दुकानाचे लोखंडी शटर उपकवुन दुकानामधिल फॅन, ड्रिल मशिन, रंगाचे डब्बे व गल्यातील चिल्लर असा माल चोरून नेला होता. त्याचप्रमाणे पोयनाड, माडवा सांगरी पोलीस ठाण्याचे हद्दीत देखील अशाच प्रकारचे गुन्हे दाखल झाल्याने पोलीसाचे समोर मोठा यक्ष प्रश्‍न निर्माण झाला होता. पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी याना घरफोडी चोरी मधील आरोपींचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उप विभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश सणस, सहा.फौज,विनोद जाधव, सहा.फौज अनिल सानप, हवालदार सचिन शेलार, सुजय मगर, नाईक हर्षल पाटील, शिपाई अनिकेत म्हात्रे यांच्या पथकाने प्रयत्न करीत चोरटयांची माहीती काढुन या गुन्हयाची उकल केली. त्यानुसार 21 ऑगस्ट 2021 रोजी जेल मधुन जामिनावर सुटलेला आरोपी हर्षल प्रमोद घरत वय 21 रा.शिरवली ता.अलिबाग याने जेल मधुन बाहेर येताच आपले साथीदार साहील संतोष चव्हाण वय 20 रा.शिरवली ता.अलिबाग, भावेश संजय म्हात्रे वय 20 रा.नारंगी ता.अलिबाग, श्रेयश अजित पाटील वय 21 रा.रांजणखार ता.अलिबाग यांच्या सोबतीने एक टोळी बनवुन रात्रीचे वेळेस पल्सर मोटार सायकलीचा वापर करून अलिबाग शहर, मांडवा पोयनाड व परीसरात घरफोडी चोरी करण्याचे सत्र अवलंबीले होते. एका रात्रीत दोन ते तिन दुकाने फोडुन हाताला लागेल त्या मालाची ते चोरी करून चोरून नेत होते.
त्यांना 09 ऑक्टोंबर 2021 रोजी अटक करण्यात आलेली असुन अलिबाग पोलीस ठाण्यातील घरफोडी चोरीचे एकुण 5 गुन्हे उघडकीस आले असुन मांडवा सागरी व पोयनाड पोलीस ठाण्याकडील प्रत्येकी 2 गुन्हे उघडकीस येत असल्याची माहिती पोलिस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम आणि पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांनी दिली.
अलिबाग पोलीस ठाण्याचे घरफोडी चोरीमधिल एन्टार्क मोटार सायकल, कॅम्प्युटर चोरीस गेलेले कपडे, हार्डवेअर दुकानातील माल, दानपेटया, व चोरी करीता वापरण्यात आलेल्या मोटार सायकल पोलीसानी आरोपींकडून जप्त केल्या आहेत. वरील गुन्हयाचा पुढील तपास अलिबाग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शैलेश सणस हे करत आहेत.

Exit mobile version