। पनवेल । वार्ताहर ।
भरदिवसा कडी-कोयंडा तोडून घरातील चार तोळे सोने, चांदी आणि 80 हजार रुपयांची रक्कम घेऊन चोरांनी पोबारा केल्याची घटना खारघर सेक्टर 10 मध्ये घडली.
खारघर सेक्टर 10 कोपरगावमधील साई व्हीलामध्ये प्रवीणकुमार चौधरी (28) राहतात. किरणा मालाचे दुकान चालवणारे प्रवीणकुमार काही कामानिमित्त घरातून बाहेर पडले होते. दरम्यान, घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी केली. चोरांनी त्यांच्या घरातील चार तोळे सोने, चांदी आणि 80 हजार रुपयांची रक्कम लंपास केली. या घटनेची नोंद खारघर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान चौधरी यांच्या घरात चोरी करतेवेळी चोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.