महाड तालुक्यात घरफोडी

| महाड | वार्ताहर |

महाड शहरातील काकरतळे उभा मारुती मंदीरा शेजारी असणार्‍या सोसायटीमधील एका बंद फ्लॅटचे कडी कोयंडे तोडून आतील कपाटातील लॉकरमध्ये असलेली रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे सव्वा लाखाचा ऐवज चोरून अज्ञात चोरांनी पोबारा केला आहे.

मुंबई-गोवा महामार्गा नजिक व शहराच्या वेशीवर असणार्‍या बंद घर अथवा फ्लॅटमध्ये आत्तापर्यंत चोरी झाल्याचे प्रकार घडले आहेत. शनिवारी (दि. 28) रात्री महाड काकरतळे उभा मारुती परिसरातील निसर्ग निर्मिती 2 गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहणारे मोहन काप हे आपल्या कुटुंबियांसमवेत नाते या गावी गेले होते. त्याचाच फायदा घेऊन बंद फ्लॅटचे कडी कोयंडे तोडून घरात घुसून अज्ञात चोरांनी कपाटे फोडून त्यातील लॉकर मध्ये ठेवलेली 50 हजाराची रोकड आणि 75 हजाराचे सोन्या चांदीचे दागीने असा सुमारे सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला. रविवारी (दि. 29) सकाळी आल्यानंतर मोहन काप यांना आपल्या फ्लॅटमध्ये चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी महाड शहर पोलिस ठाण्यात तक्रार केली, असून महाड शहर पुढील तपास करीत आहेत.

Exit mobile version