| महाड | प्रतिनिधी |
महाड शहरातील काकर तळे भागातील उभा मारुती मंदिरासमोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकी वरील तिघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी महाड शहर पोलिसांनी एका दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला आहे. 18 डिसेंबरला दुपारी दोनच्या सुमाराचा अपघात घडला.
कारंजखोल येथील तरुण हंसराज वर्मा हा आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन बुटाला सभागृहाकडून काकरतळे या दिशेला भरधाव वेगाने व बेदरकारपणे दुचाकी चालवत येत होता. याच दरम्यान उभा मारुती मंदिरा जवळ त्यांच्या दुचाकीने समोरून येणार्या दुसर्या दुचाकीला धडक दिल्याने त्या दुचाकी वरील रिहान शेख ( साहिल नगर ) व त्याच्यासोबत असणारी सहप्रवासी दीक्षिता मोरे ( चांभारखिंड) हे दोघे जखमी झाले. तर दुसर्या दुचाकीवरील हंसराज वर्मा हा देखील या घटनेत जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हंसराज वर्मा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.