माणगावात घरफोडी; हजारो रुपयांची चोरी

| माणगाव | वार्ताहर |

घरातील रूमच्या दरवाज्याची कडी हत्याराने तोडून मंगळवारी (दि.18) सायंकाळी 5:30 ते रात्री 11:30 च्या दरम्यान चोरटा घरात घुसला. त्यांनी 22 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून तो फरार झाला आहे. घटना गोल्डन पार्क रेसिडेन्सी, पहिला मजला रूम नं. 103 बी माणगाव या ठिकाणी घडली. या घटनेची माहिती अमोल प्रल्हादराव साळवे (37) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात  दिली आहे.

घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, अमोल प्रल्हादराव साळवे यांच्या माणगाव येथील राहते घरातील रूमच्या दरवाज्याची कडी तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोराने घरातील 22 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून तो फरार झाला आहे. घडलेल्या घटने विरुद्ध माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सानप हे करीत आहेत. 

Exit mobile version