माणगावात घरफोडी! ६५ हजाराचा माल लंपास

। माणगाव । वार्ताहर ।
माणगावपासून १ किमी अंतरावर असणाऱ्या ढालघर फाटा येथील अशनाज कॉम्प्लेक्समध्ये फिर्यादी यांच्या घरात घरफोडी चोरी करून अज्ञात चोरटा ६५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून पसार झाला आहे. सदरील घटना दि. २ जानेवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबतची फिर्याद दीपिका विलास पवार(वय-२८) रा.अशनाज कॉप्लेक्स ढालघर फाटा माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि,घटनेतील फिर्यादी दीपिका विलास पवार व त्यांचे पती हे नेहमीप्रमाणे बँकेत नोकरीस जाताना घराचे खिडक्या व दरवाजे बंद करून लॉक करून गेले असताना त्यादरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घराच्या मागील बाजूकडील खिडकीच्या वाटे घरात आतमध्ये प्रवेश करून फिर्यादी यांचे पती यांनी रात्री बेडरुमधे बेडच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली एक ९१६ कॅरेटची चॉकलेट सोन्याची चैन वजन १३.८५० ग्राम जुनी वापरती अंदाजित किंमत ६५ हजार रुपये व एक पोट्रोनिक्स कंपनीचा लहान ब्लूटूथ स्पीकर ५०० रुपये किंमतीचा असा एकूण ६५ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज चोरून अज्ञात चोरटा पसार झाला आहे.

या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.२/२०२३ भादवि कलम ३८०,४५४ प्रमाणे दाखल करण्यात आली आहे.सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जे.डी.कदम हे करीत आहेत.

Exit mobile version