रामवाडी येथील एसटी कॉलनीत घरफोडी 

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पेण रामवाडी येथील एसटी कॉलनीमध्ये घरफोडी करून हजारो रुपयांचा ऐवज लंपास करण्याची घटना घडली आहे. यामुळे एसटी कॉलनीमध्ये राहणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रामवाडी एसटी कॉलनीत राजगड बिल्डींगमधील दुसर्‍या मजल्यावरील रूम नं. 10 मध्ये राहणारे कर्मचारी आपल्या कुटुंबासह बाहेर गावी गेल्याचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाज्याची कडी तोडुन घरात प्रवेश केला. तसेच घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. सुमारे 17 हजार रुपये किंमतीच्या वस्तू चोरट्याने लंपास केल्या. दुसर्‍या मजल्यावरील रूम नंबर 10 च्या आजूबाजूला असलेल्या इतरही खोल्यांचे चोरट्याने लॉक तोडून चोरीचा प्रयत्न केला.

याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार भोनकर अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version