दोन घरांमध्ये घरफोडी

। पनवेल । प्रतिनिधी ।

दोन बंद घरांमध्ये घरफोडी करत चोरांनी चांदीच्या, पितळेच्या वस्तू आणि रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणी खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नवीन पनवेल येथील अर्जुन मोहिते यांच्या रूमच्या दरवाजाचे लॉक तोडून चोराने चांदीच्या समई, घंटी, पैंजण, जोडवी, कंगन, सोन्याचे बदाम, रोख रक्कम आणि देवाच्या पितळेच्या मूर्ती चोरून नेल्या तर त्यांच्याच सोसायटीमधील पहिल्या माळ्यावरील रूम नंबर तीन मधील अक्षया व्यंकटेश्‍वरा यांच्या घरातून देखील चांदीचे दिवे, समई, वाट्या, ग्लास आणि रोख रक्कम व देवीच्या मूर्ती चोरून नेल्या.

Exit mobile version