। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल शहरातील तक्का तसेच करंजाडे परिसरात घरफोडी करणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचा माल व रोख रक्कम हस्तगत केली आहे.
शहरातील तक्का परिसरात आरोपी ललित शाही (33), किशोर शाही (29) व शेरबहादूर शाही (35) यांनी आपसात संगनमत करून जवळपास 60,88,000/- रु किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम व घड्याळ घरफोडी करून चोरून नेले होते. तश्याच प्रकारे करंजाडे येथे सुद्धा घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा लाखो रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याबाबत तक्रार दाखल होताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, पोहवा परेश म्हात्रे, गंथडे, वायकर, दिवेकर, पोना सम्राट डाकी, विनोद देशमुख आदींच्या पथकाने आरोपीना ताब्यात घेऊन यांच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरीचा माल हस्तगत केला आहे.







