। पनवेल । प्रतिनिधी ।
उभ्या केलेल्या ट्रेलरच्या डिझेल टाकीचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यानी डिझेलची चोरी केल्याची घटना तालुक्यातील साईबाबा ढाबा, बोरले गांव येथे घडली आहे. मोहम्मद लतिफ मोहम्मद हालीम (38) यांनी त्यांच्या ताब्यातील ट्रेलर हा ज्योती ट्रान्सपोर्ट गैरेज, साईबाबा ढाबा, बोरले गांव येथे उभा ठेवला असता अज्ञात दोन व्यक्तींनी तेथे त्याच्या ताब्यातील गाडी आणून ट्रेलरच्या डिझेल टाकीचे कुलुप तोडून 26,416/- रुपये किमतीचे एकूण 290 लिटर डिझेल चोरून नेल्याने या बाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.







