| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबागमधील विद्यानगरमध्ये घरफोडी करून चोरट्यांनी आठ लाख 11 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी दुपार ते सायंकाळच्या दरम्यान घडली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील कार्ले येथील मूळचे रहिवासी असणारे रुपेश पाटील हे विद्यानगर येथील प्रमिला हाऊसिंग सोसायटीमध्ये सध्या राहात आहेत. रविवारी (दि.6) दुपारपासून यांचे घर बंद होते. दुपारी साडेतीन ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. त्यानंतर घरात घुसून कपाटातील लॉकरमधील सोन्याचे व चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण आठ लाख 11 हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. यामध्ये आठ हजार रुपयांची रोकड, साडेतीन लाख रुपयांचे मंगळसूत्र, 49 हजार रुपये आणि एक लाख 75 हजार रुपयांचे दोन सोन्याचे हार, 70 हजार रुपयांची सोन्याची चेन, सोन्याचे ब्रेसलेट, अंगठ्या, नथ, तसेच कमरेचा छल्ला, साखळी, कडे आदी चांदीच्या ऐवजाचा समावेश आहे.
विद्यानगरमध्ये आठ लाखांची घरफोडी
