। मुंबई । प्रतिनिधी ।
नाशिक – पुणे महामार्गावर काल रात्रीच्या सुमारास धावत्या बसला आग लागल्याची घटना घडली आहे. सिन्नरच्या मोहदरी घाटात धावत्या खासगी बसला अचानक आग लागली. ही खाजगी बस नाशिकहून कोल्हापूरला निघाली होती. यावेळी या खासगी आराम बसने अचानक सिन्नरच्या घाटात पेट घेतला.
या आगीत बस पूणर्पणे जळून खाक झाली आहे. असे असले तरी दिलासादायक बाब म्हणजे सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.
बसला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. बसने पेट घेतल्यानं मोहदरी घाटात दोन्ही बाजूंनी वाहतुकीची काही काळ ठप्प झाली होती. 30 ते 35 प्रवासी या बसमध्ये होते हे सर्व प्रवासी सुखरूप आहे. चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थांबवून सर्वांना खाली उतरल्याने जीवितहानी टळली. मात्र या घटनेमुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.







