27 जण जखमी
। माणगाव । प्रतिनिधी ।
ताम्हिणी घाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 20) सकाळी 9.30 च्या सुमारास झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 27 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी माणगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
जाधव कुटुंबीय शुक्रवारी सकाळी लोहगाव पुणे येथून बिरवाडी महाड येथे खासगी बसने लग्न समारंभास जात होते. दरम्यान ताम्हिणी घाटात आले असता धोकादायक वळणावर बसचालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून बसमधील 27 जखमी लोकांना बाहेर काढून त्यांना माणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
मृतांमध्ये 2 पुरुष व 3 महिलांचा समावेश असून संगिता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदिप पवार, वंदना जाधव अशी मृतांची नावे आहेत. त्यातील एका पुरुषाची अजून ओळख पटलेली नाही.