। बीड । वृत्तसंस्था ।
पगार वेळेवर न झाल्याने चिंताग्रस्त बस चालकाने घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तुकाराम सानप असे आत्महत्या करणार्या चालकाचे नाव असून ते बीड आगारात कार्यरत होते. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाच गेल्या काही महिन्यांपासून पगार वेळेवर होत नसल्याने आगारातील सर्वच कर्मचार्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत होते. या आर्थिक विवंचनेचा भार सहन न झाल्याने यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती नातेवाईकांनी आणि बस स्थानकातील कर्मचार्यांनी दिली आहे. दरम्यान, काम करुन सुद्धा कर्मचार्यांना वेळेवर पगात मिळत नसतील तर संबंधित मंत्री आणि अधिकार्यांवर गुन्हे नोंद करा, अशी मागणी बस कर्मचारी करीत आहेत.
बस चालकाची आत्महत्या
