15 ते 20 जण जखमी
। पुणे । प्रतिनिधी ।
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लक्झरी बसने ट्रकला मागून धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, 15 ते 20 जण जखमी झाले आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावर बुधवारी (दि. 25) पाहटे चार वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील खडकीजवळील विसावा हॉटेलजवळ हा भीषण अपघात झाला. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लक्झरी बसने ट्रकला मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 15 ते 20 जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. मात्र घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी अपघातातील जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ भिगवण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला करून मार्गावरील वाहतूक पूर्ववत केली.





