| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईच्या लालबागमध्ये रविवारी (दि.1) रात्री दारुच्या नशेत धुंद असलेल्या प्रवाशाने बेस्टच्या बस चालकासोबत वाद घातला. यानंतर त्याने स्टेअरिंग धरून ठेवले. यामुळे बसचे नियंत्रण सुटले आणि रस्त्यावरील 9 जणांना धडक दिली, ह्या बसच्या अपघातात 28 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाला असून, नुपुरा मण्यार असे अपघाता मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लालबागमधील गणेश टॉकीज इथे बस पोहोचताच दारुच्या नशेत असलेल्या एका प्रवाशाने बस चालकाशी वाद घातला. यानंतर प्रवाशाने बसचे स्टेअरिंग पकडले. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि अनेक दुचाकींना बसने धडक दिली. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. काळाचौकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रूट 66 वर एक इलेक्ट्रिक बस सायनच्या राणी लक्ष्मीबाई चौकाच्या दिशेने जात होती तेव्हा ही घटना घडली आहे. या प्रकरणी दारुच्या नशेत असलेल्या प्रवाशाला ताब्यात घेतले असून चौकशी केली जात आहे.