गारंबी रस्ता खचल्याने बससेवा बंद

स्थानिक प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे हाल

| मुरूड | प्रतिनिधी |

मुरूड-केळघर रस्ता गारंबीनजीजक खचल्याने दोन महिन्यांपासून एस.टी. वाहतूक बंद झाली असल्याने स्थानिक प्रवासी व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मिळेल त्या वाहनाने, नाहीतर पायपीट करून शाळेत पोहोचावे लागत आहेत. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने लवकरात लवकर खचलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

मुरूड तालुक्यातील केळघर मार्गावर गारंबीनजीक दोन ठिकाणी रस्ता मुसळधार पावसामुळे खचला आहे. यावेळी बांधकाम खात्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करून आपली भूमिका बजावली आहे. परंतु गेली दोन महिन्यांपासून एसटी वाहतूक बंद केल्याने स्थानिक प्रवासी व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. गारंबी-केळघर भागात नागशेत, फणसवाडी, गोपाळवाट, पारगाव, वाघरपट्टी, म्हसाडी, कांटी बोडण, अशी अनेक गावे डोंगराळ भागात वसलेली आहेत. या भागातील लोकांना एकमेव साधन म्हणून एसटी उपलब्ध आहे. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून ही सेवा रस्ता खचल्याने बंद पडली आहे. त्यामुळे बांधकाम खात्याने लवकरात लवकरात खचलेले रस्ते बनवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Exit mobile version