नवीन जंबो कार्यकारिणी जाहीर; तालुका चिटणीसपदी तानाजी मते
| नेरळ | प्रतिनिधी |
ताकदवान पक्ष म्हणून ओळखला जाणाऱ्या आणि आता संक्रमानातून जात असलेल्या शेतकरी कामगार पक्ष नव्याने बांधणीच्या तयारीला लागला आहे. शेकापने कर्जत तालुक्यात पक्ष उभारणीसाठी नवीन जंबो कार्यकारिणी बनविली आहे. दरम्यान, शेकाप कर्जत तालुका चिटणीस म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजी मते यांची निवड करण्यात आली आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा चिटणीस मंडळाच्या माध्यमातून आणि पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या मान्यतेने कर्जत तालुका कार्यकारिणी बनविण्यात आली आहे. कर्जत येथील मार्केट यार्डमध्ये शेकाप कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी नवीन पदाधिकारी यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी तालुका चिटणीस म्हणून तानाजी मते यांना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर माजी तालुका चिटणीस श्रीराम राणे यांना जिल्हा खजिनदार करण्यात आले आहे.
तसेच, महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून स्विटी बार्शी, युवक अध्यक्ष अनिल जोशी, शेतकरी सभा अध्यक्ष प्रकाश फराट, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष सर्फराज नजे, व्यापारी सेल तालुकाध्यक्ष नितेश शाह, आदिवासी सेल तालुकाध्यक्ष दत्तात्रय निरगुडा, आरोग्य सेवा सेल अध्यक्ष हनुमंत बदे, विद्यार्थी संघटना अध्यक्ष सागर पेमारे, कामगार आघाडी दत्ताराम जगताप, अधिवक्ता आघाडी अध्यक्ष ॲड. सतीश पाटील, शिक्षक आघाडी अध्यक्ष प्रमोद गाडे, क्रीडा सेल अध्यक्ष जीवन कोंडिलकर, दिव्यांग सेल अध्यक्ष अरुण जोशी आणि शेतमजुर आघाडी मोहन पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, कर्जत तालुक्यातील सात कार्यकर्त्यांना जिल्हा चिटणीस मंडळात सहभागी करून घेतले आहे. त्यात माजी सरपंच पुंडलिक शिनारे, गजानन पेमारे, पांडुरंग बदे, सुहास भगत, दीपक लोभी, सुधीर कांबळे आणि रमाकांत तोरणे यांना संधी देण्यात आली आहे.
तालुका सह चिटणीस अशोक भुसाळ, रविंद्र भोईर आणि मंदा म्हात्रे यांना संधी देण्यात आली आहे. कार्यालय चिटणीस व तालुका खजिनदार म्हणून दत्तात्रेय राणे, राजेंद्र हजारे आणि सदस्य म्हणून कृष्णा बदे, रामचंद्र भोईर, बबन भालेराव, शिवाजी बिबवे, प्रकाश ऐनकर, कृष्णा शिंगे, महादेव मरे, दिलीप पाटील, राजन विरले, शंकर देशमुख, विष्णू कालेकर, नीलम ढोले, शैला निकम, शिल्पा लोभी, नामदेव सोनवले, शिवाजी भगत, दशरथ शेंडे, अनंता शिंगोले, बबन गांधीवले, अनंत दळवी, दीपक पाटील, सुनील भागीत, पुंडलिक मसणे, मारुती विरले, नरेंद्र हजारे, दीपक धुळे, तानाजी लोभी, छगन सावंत, अरुण शेळके, ताटूराम जाधव व माधव मिणमिणे आदी या कार्यकारिणीत आहेत. शहर चिटणीस मंडळात कर्जत शहर चिटणीसपदी श्रीकांत आगविले, नेरळ शहर चिटणीसपदी शंकर घोडविंदे, माथेरान शहर चिटणीसपदी उमेश कदम तर कर्जत शहर महिला आघाडी अध्यक्ष म्हणून वर्षा डेरवणकर यांची निवड करण्यात आली आहे.






