शहाबाजमध्ये बस थांबा फलकाचे अनावरण

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग- पेण मार्गावरील शहाबाज येथील स्थानकाजवळ बस विनंती थांबा फलकाचे अनावरण नुकतेच करण्यात आले. शहाबाजमधील ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष मोहन पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या फलकाचे अनावरण करण्यात आले आहे.

अलिबाग-पेण मार्गावरून येणार्‍या जाणार्‍या साधी, जलद, निमआराम अशा सर्व प्रकारच्या गाड्या शहाबाज येथे थांबविण्यासाठी आदेश देण्यात आले होते. मधल्या काळात रिकामी गाडी सुद्धा थांबविण्यात येत नव्हती. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली होती. ज्येष्ठ नागरिक संघटना शहाबाज आणि पायरी गृप यांच्या अथक प्रयत्नानंतर बस थांबा फलकाचे अनावरण करण्यात आले. शहाबाज ग्रामस्थांनी सुद्धा फलक उभारण्यासाठी मोलाची मदत केली. एसटी महामंडळ रायगड विभागाचे विभाग नियंत्रक दिपक घोडे, स्नेहल सरडे, आगार व्यवस्थापक अर्पणा वर्तक, अशिष पाटील यांचे ज्येष्ठ नागरिक संघटना व पायरी गृपच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी गावांतील ग्रामस्थ, महिला, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी, वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी, मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version