| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबागमधील कोकण एज्यूकेशन सोसायटीच्या आवारात मंगळवारी (दि.3) लोकनेते ॲड. दत्ता पाटील यांच्या सहचारिणी पुष्पा पाटील यांच्या रंगमंचाच्या नामकरण फलकाचे अनावरण करण्यात आले. पुष्पा पाटील यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्तान कोएसोचे अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ पाटील यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा पार पडला. तसेच, या रंगमंचाच्या बांधकामासाठी कोएसोचे संचालक संजय पाटील यांनी मातृऋणातून उतराई होण्यासाठी स्वखर्चाने पूर्ण करून दिले. या कार्यक्रमाला कोएसोच्या कार्यवाह, ॲड. पल्लवी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता पाटील, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश पाटील, सचिव समन्वय समिती संदीप चेरकर, प्रशासन अधिकारी प्रा. सरेंद्र दातार, प्रा. डॉ. अतुल साळुंखे व कोएसो अलिबाग संकुलातील मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, सेवकवर्ग उपस्थित होते.






