झुडपांमुळे अपघातास आमंत्रण

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुड-रोहा प्रवासात जवळचा मार्ग असलेल्या सुपेगांव रस्त्यालगत अनेक ठिकाणी असलेला झाडाझुडपांचा विळखा अपघाताला आमंत्रण ठरत आहे. याकडे संबंधित बांधकाम खात्याचे दुर्लक्ष असल्याने पर्यटक, प्रवासी, वाहनचालकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

मुरुड-जंजिरा या ठिकाणी पर्यटनासाठी रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर अन्य ठिकाणाहून काशिद-बिच, फणसाड अभयारण्य, मुरुड-जंजिरा किल्ला पाहाण्यासाठी रोहा सुपेगांवमार्गे पर्यटक येत आसतात. मागील महिन्यापासून या रस्त्यालगत झाडाझुडपांचा विळखा वाढला असून काही ठिकाणी रस्त्यावर झाडे झुकलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे वाहन दिसत नसल्याने वेळप्रसंगी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बांधकाम विभागाने झाडाझुडपांचा विळखा हटविण्यात यावा अशी मागणी पर्यटक, प्रवासी, वाहनचालक व नागरिकांतून जोर धरीत आहे.

Exit mobile version