| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेलजवळ एका अज्ञात पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मयताची ओळख अद्याप पटलेली नसून, त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पनवेल तालुका पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. दि.2 जुलै रोजी एका रिसॉर्टच्या मागील डोंगराळ झाडीत हा मृतदेह आढळला होता. हा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटविणे कठीण झाले आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. ही मृत व्यक्ती अंदाजे 40 ते 45 वर्षे वयोगटातील पुरुष असून, केस काळे आहेत. चेहरा पूर्णपणे विद्रूप झालेला आहेत. तसेच, अंगावर राखाडी रंगाची हाफ पॅन्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अव्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







