आदिवासी महिलांना व्यवसाय प्रशिक्षण शिबिर

। रोहा । प्रतिनिधी ।
कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या उद्देशाने व स्वयंरोजगार उपलब्धतेसाठी अनुसूचित जाती मागासवर्गीय अशा समाजातील सर्व स्तरातील महिलांना व्यवसाय प्रशिक्षण व स्वयंरोजगार मार्गदर्शनाचा लाभ देण्याच्या उद्देशाने विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिटयूट रोहा रायगड व जन शिक्षण संस्थान रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने देवकान्हे गावातील महिलांसाठी व धानकान्हे आदिवासी वाडीतील महिलांसाठी 2 महिन्याचा पूर्णवेळ शिवणक्लास शिबिरास सुरुवात करण्यात आली आहे.
या शिबिरात एकूण 44 महिलांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या कार्यक्रमाला प्रथम नागरिक वसंत भोईर तसेच जन शिक्षण संस्थेकडून प्रोग्राम लीडर सुकन्या, प्रशिक्षक शामल आणि एक्सेल कंपनीकडून सुशिल रुळेकर, सीएसआर मॅनेजर/व्हीआरटीआय प्रमुख रोहा, रिटा कशवालीया प्रोजेक्ट लीडर उपस्थितीत होत्या. सदर उपक्रमासाठी संस्थेचे ट्रस्टी गोसालीया, आदित्य कुमार निगम, मंचेकर व नितीन जोशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Exit mobile version