अटल सेतूवरुन व्यावसायिकाची आत्महत्या

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबईत अटल सेतूवरुन आणखी एक आत्महत्या करण्यात आली आहे. माटुंग्यातील 52 वर्षीय व्यावसायिकाने अटल सेतूवरुन समुद्रात उडी मारुन जीवन संपवलं असं वृत्त समोर आले आहे. उपव्यवस्थापकाचा मृतदेह नवी मुंबईतील समुद्रकिनारी वाहून गेलेला आढळून आला, अशी माहिती पोलिसांनी दिली. फिलीप शाह या व्यावसायिकाने बुधवारी सकाळी अटल सेतूवरून उडी मारून आपले जीवन संपवले. मध्य मुंबईतील माटुंगा येथील रहिवासी असलेल्या शाह आपल्या सेडान कारमधून अटल सेतूवर पोहोचले होते. एका ठिकाणी त्यांनी आपली कार पार्क केली आणि समुद्रात उडी मारली, असे वृत्त पीटीआयने एका पोलीस अधिकार्‍याच्या हवाल्याने दिली आहे.

पोलिस अधिकार्‍याने सांगितलं की, पुलाच्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाच्या कर्मचार्‍यांना पुलावर एक कार उभी असल्याचे लक्षात आले. त्यानंतर बचाव पथकाला सतर्क करण्यात आले. फिलिप शाह यांनी ज्या ठिकाणी समुद्रात उडी मारली त्या ठिकाणी तेथील कर्मचारी धावले. शोधमोहीम राबवली असता फिलीप शाह यांचाशोध लागला. फिलिप शाह यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांना मृत घोषित करण्यात आलं अशी माहिती पोलीस अधिकार्‍याने दिली आहे.

Exit mobile version