। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. या जागांसाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर गुजरात आणि हिमाचलसह 8 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव ) यांचे निधन झालं. त्यामुळं यूपीची मौनपुरी लोकसभा जागा रिक्त झाली.
तिथं आता निवडणूक आयोगानं पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. याशिवाय ओडिशातील पदमपूर, राजस्थानमधील सरदारशहर, बिहारमधील कुधनी, छत्तीसगडमधील भानुप्रतापपूर आणि यूपीमधील रामपूर येथेही पोटनिवडणूक होणार आहे.