अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार?

| नागपूर | वृत्तसंस्था |

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपताच शिंदे सरकारचा विस्तार होण्याची शक्यता असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. अजित पवार गटाला आणखी एक कॅबिनेट, दोन राज्यमंत्रिपद वाट्याला येण्याची शक्यता आहे. हा विस्तार झाल्यास राज्याचा तिसरा टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार हा पूर्ण होईल.

या विस्तारामध्ये राष्ट्रवादीला तीन मंत्रीपदं म्हणजे एक कॅबीनेट आणि दोन राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. त्यामुळे महामंडळांचे वाटप करून सर्व कार्यकर्ते, नेत्यांचे नववर्ष आनंदात सुरू होणार असल्याच्या चर्चा म्हटलं जातय. म्हणून या विस्तारामध्ये अजूनही महामंडळाचे वाटप होण्याची शक्यता आहे.याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे-फडणवीसांवर मोठा दबाव असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे शिंदे गटातील भरत गोगावले, संजय शिरसाट यांच्यासारखे नेतेही मंत्रिपद मिळवण्यास उत्सुक आहेत. यापूर्वीच्या विस्तारात राष्ट्रवादीला झुकते माप मिळाल्यामुळे शिंदे गट नाराज असल्याच्या बातम्या होत्या. त्यामुळे आता तिसऱ्या टप्प्यातील विस्तार झाल्यास शिंदे गटातील कोणत्या आमदारांची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Exit mobile version