‘मोदी सरकार 2.0’चा मंत्रिमंडळ विस्तार

नारायण राणेंसह महाराष्ट्रातून चार नेत्यांना संधी, दोघांना डच्चू
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळ विस्तार बुधवारी पार पडला. महाराष्ट्रातून चार नव्या चेहर्‍यांचा मंत्रिमंडळात समावेश करताना, दोन मंत्र्यांना मात्र डच्चू देण्यात आला आहे. नव्या मंत्रिमंडळात नारायण राणे यांच्यासह कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड यांच्या गळ्यात मंत्रीपदाचा माळ पडली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण 43 नव्या मंत्र्यांचा राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला.

मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारात देशभरातील अनेक नेत्यांची वर्णी लागली आहे. या नव्या विस्तारात महाराष्ट्रातील चौघांना संधी मिळाली असून, आधी दोन मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या कोट्यातून मंत्री रावसाहेब दानवे आणि संजय दोत्रे या दोघांनीही मोदी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील प्रकाश जावडेकर आणि संजय धोत्रे दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. महाराष्ट्रातून नव्या विस्तारात नारायण राणे, कपिल पाटील, डॉ भारती पवार, डॉ भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.

केंद्रामध्ये राज्यातील नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, संजय धोत्रे हे आधीपासून मंत्री होते. यापैकी प्रकाश जावडेकर आणि संजय धोत्रे यांनी राजीनामा दिला आहे. आता नव्याने चार मंत्री झाल्यामुळं राज्यात आठ केंद्रीय मंत्री असणार आहेत. दरम्यान, आज 36 नवे मंत्री शपथ घेणार असून 7 राज्यमंत्र्यांचं कॅबिनेट मंत्री म्हणून प्रमोशन झालं आहे.

12 मंत्र्यांचे राजीनामे
मोदींच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होत असतानाच जुन्या मंत्र्यांनी एकापाठोपाठ एक असे राजीनामे दिले आहेत. आतापर्यंत एकूण 12 मंत्र्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद, शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल निशंक, आरोग्य राज्यमंत्री अश्‍विनी चौधरी, महिला व बालविकास मंत्री देवोश्री चौधरी, खते व रसायनमंत्री सदानंद गौडा, कामगार राज्यमंत्री संतोष गंगवार, शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे, डॉ. बाबुल सुप्रियो, प्रताप सारंगी आणि रतनलाल कटारिया, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांचा समोवश आहे.
महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना डच्चू
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांनी एकामागोमाग एक राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे, एकीकडे महाराष्ट्रातील नवीन मंत्र्यांना संधी देतानाच महाराष्ट्रातील दोन राज्यमंत्र्यांनी राजीनामे दिलेत. यामध्ये भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ग्राहक संरक्षण आणि नागरीपुरवठा खात्याची जबाबदारी असणार्‍या रावसाहेब दानवे-पाटील यांच्यासह भाजपाचे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी सुद्धा आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. राज्यमंत्री धोत्रे यांच्याकडे मनुष्यबळ विकास, दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान या खात्यांची जबाबदारी होती.

मंत्रिमंडळातील नवे नेते
1) नारायण राणे, 2) कपिल पाटील, 3) सर्वानंद सोनोवाल, (आसामचे माजी मुख्यमंत्री ), 4) ज्योतिरादित्य शिंदे, (काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले राज्यसभेचे खासदार), 5) रामचंद्र प्रसाद सिंघ, 6) अश्‍विनी वैष्णव, 7) पशुपती पारस (‘लोक जनशक्ती’च्या बंडखोर गटाचे प्रमुख), 8) किरन रिजिजू, 9) राज कुमार सिंघ, 10) हरदीप पुरी, 11) मनसुख मांडविया, 12) भुपेंद्र यादव, 13) पुरुषोत्तम रुपाला, 14) जी. किशन रेड्डी, 15) अनुराग ठाकूर, 16) पंकज चौधरी, 17) अनुप्रिया पटेल, 18) सत्यपाल सिंघ बाघेल, 19) रजीव चंद्रशेखर, 20) शोभा करंदलाजे,21) भानू प्रताप सिंघ वर्मा, 22) दर्शना विक्रम जारदोश, 23) मिनाक्षी लेखी, 24) अन्नपुर्णा देवी, 25) ए. नारायणस्वामी, 26) कौशल किशोरे, 27) अजय भट्ट, 28) बी. एल वर्मा, 29) अजय कुमार, 30) चौहान दिव्यांशू, 31) भागवंत खुंबा, 32) प्रतिमा भौमिक, 33) सुहास सरकार, 34) भागवत कृष्णाराव कराड, 35) राजकुमार राजन सिंघ, 36) भारती प्रवीण पवार, 37) बिश्‍वेश्‍वर तूडू, 38) सुशांतू ठाकूर, 39) डॉ. मुंजपारा महेंद्रभाई, 40) जॉन बिरला, 41) डॉ. एल मुरगन, 42) निशित प्रमाणिक, 43) डॉ. विरेंद्र कुमार.

Exit mobile version