शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार

एकूण १८ मंत्र्यांनी घेतली कॅबिनेट पदाची शपथ

। मुंबई । वार्ताहर ।

अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कुणाला संधी मिळाली आहे हे स्पष्ट झालं आहे. ठाकरे सरकारला पायउतार करून सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार राजभवन येथे 11 वाजता पार पडला. यावेळी राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिंदे गटातील 9 आणि भाजपमधील 9 मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची गोपनीयतेची शपथ दिली.

भाजपाकडून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांसह अनेक ज्येष्ठ नेत्यांना संधी मिळाली आहे. दुसरीकडे शिंदे गटाकडून शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांसह नऊजणांना संधी मिळाली आहे.

मागील अनेक दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याची चर्चा रंगली होती. विरोधी पक्षनेते अजित पवारांसह महाविकासआघाडीच्या अनेक नेत्यांनी रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली होती. दिल्लीतून मान्यता मिळाल्याशिवाय मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही. त्यामुळेच दोघांच्याही दिल्ली वाऱ्या सुरू असल्याचा खोटक टोलाही लगावण्यात आला होता. मात्र, अखेर आज ९ ऑगस्ट मंत्रीमंडळ विस्तार झाला.

भाजपमधून या मंत्र्यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ

गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा

शिंदे गटातील या नेत्यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ

तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील

Exit mobile version