। तळा । वार्ताहर ।
तळा शहरातील भोईरवाडी येथे कुत्र्यांच्या टोळीने केलेल्या हल्ल्यात गाईचे वासरू गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. भोईरवाडी येथील सुरेश चोरगे यांच्या वाड्यात असलेल्या वासरावर शुक्रवारी दुपारी जवळपास दहा कुत्र्यांच्या टोळीने हल्ला चढवला. कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज ऐकून चोरगे वाड्याकडे धावले असता कुत्र्यांच्या टोळीने वासरावर हल्ला केल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी तातडीने कुत्र्यांच्या तावडीतून वासराची सुटका केली परंतु या हल्ल्यात वासरु गंभीर जखमी झाला आहे. नगरपंचायतीकडून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कधी केला जाईल का याकडे तळावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.