| आगरदांडा | वार्ताहर |
तिरंगा अभियानाच्या निमित्ताने मुरुड पालिकेच्यावतीने शहरात साडेपाच हजार ध्वजांचे वितरण केले जाणार आहे. नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान घरावर तिरंगा झेंडा लावून या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी केले आहे.
मोहिमेला यशस्वी करण्यासाठी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, व्यवसायिक, लोकप्रतिनिधीं असे दानशूर व्यक्ती पुढे येऊन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व जमा झालेल्या वर्गणीमधुन व नगर पालिकेच्या फंडातुन खर्च करुन 5 हजार 500 तिरंगा झेंडे मागविण्यात आले आहेत. पालिकेच्यावतीने नागरिकांना घरोघरी मोफत झेंडे व झेड्याला लागणारी काठीचेही वाटप केले जात आहे. नगरपरिषदेचे कर्मचारी अभिजित कारभारी, निलेश शेडगे आदींसह कर्मचारी हे कर्मचारी वाटप करीत आहेत.