16 फेब्रुवारीला ‌‘भारत बंद’ची हाक

संयुक्त किसान मोर्चासह विविध शेतकरी संघटनांचा सहभाग


| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी 16 फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे. त्यांनी शेतकरी आणि दुकानदारांनाही या भारत बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. एमएसपी, नोकरी, अग्निवीर, पेन्शनच्या मुद्द्यांवरून भारत बंद पुकारण्यात आला आहे.

राकेश टिकैत यांनी सांगितले की, 16 फेब्रुवारीला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. यामध्ये संयुक्त किसान मोर्चासह इतर अनेक संघटना सामील झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी 16 फेब्रुवारी रोजी शेतात काम करू नये. अमावस्येच्या दिवशी शेतकरी शेतात काम करत नाहीत. त्यामुळे 16 फेब्रुवारी रोजी अमवास्याप्रमाणे शेतकऱ्यांनी शेतात काम करू नये. दुकानेही बंद ठेवण्याची विनंती आहे. यामध्ये एमएसपी, नोकरी, अग्निवीर, पेन्शन आदी मुद्दे मांडले जाणार आहेत. देशात कृषी संप झाला तर मोठा संदेश जाईल.

Exit mobile version