27 सप्टेंबरला भारत बंदची हाक

शेतकरी विरोधी कृषी कायद्या विरोधात शेकाप आक्रमक
सहभागी होण्याचे आवाहन
अलिबाग । शहर प्रतिनिधी ।

केंद्र सरकारने संमत केलेल्या तीन शेतकरीविरोधी कृषी कायद्यांच्या विरोधात मागील 9 महिन्यांपासून राजधानी नवी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. शेतकरी-विरोधी तिन्ही कृषी कायदे मागे घ्या, रद्द करा अशी शेतकर्‍यांची प्रमुख मागणी आहे.या आंदोलनकारी शेतकर्‍यांच्या ‘संयुक्त किसान मोर्चा’ ने येत्या 27 सप्टेंबर 2021 रोजी ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे.या आंदोलनात शेतकरी कामगार पक्ष सहभागी होणार असून,हा बंद यशस्वी करण्याचे आवाहन शेकाप सरचिटणीस आम.जयंत पाटील यांनी केले आहे.
शेकापचे कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड.राजेंद्र कोरडे यांनी या संदर्भात निवेदन प्रसिद्धीस दिले असून,यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप-प्रणित सरकारने शेतकर्‍यांचे आंदोलन एकीकडे अनुल्लेखाने दुर्लक्ष करून संपविण्याचा प्रयत्न केला. तसेच तद्नंतर ते प्रचंड पोलिसी दहशत व दडपशाहीने चिरडण्याचा प्रयत्न केला. परंतु अद्यापही शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम असून आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. उत्तर भारतात शेतकर्‍यांनी भरवलेल्या महापंचायतीला लाखो शेतकरी एकत्रित जमा होत आहेत. मोदी सरकारच्या या अन्यायकारी कायद्यांच्या विरोधातदेशातील प्रमुख कामगार संघटनांनी ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे. कामगार संघटनांनी लढून मिळवलेले 44 कामगार कायदे रद्द करून लागू केलेल्या 4 कामगार विरोधी ‘श्रम संहिता- ङरर्लेीी लेवश’ रद्द कराव्यात अशी मागणी केली आहे.

केंद्र सरकारची धोरणे ही शेतकरी व कामगाराविरोधी तर आहेतच, महागाई आणि बेरोजगारी वाढवणारीसुद्धा आहेत. या सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील अनेक उद्योग मोडीत काढून ते खाजगी उद्योग समूहांना कवडीमोल किंमतीत विकण्याचा सपाटा लावला आहे.
अ‍ॅड.राजेंद्र कोरडे,शेकाप कार्यालयीन चिटणीस

मोदी सरकारच्याधर्माच्या नावाने समाजात दूही माजवून विखारी विद्वेष पसरवण्याचा धंदा जोमात सुरू आहे. सर्व लोकशाही संकेत पायदळी तुडवून एकाधिकारशाहीकडे वाटचाल सुरू असून हे सरकार हे सरकार सत्तारूद्ध राहिले तर भारतीय संविधानाचा गाभा असलेली सार्वभौमता, समाजवाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधूता ही मूल्ये नष्ट केली जातील ही साधार भीती असल्याचेही शेकापच्या निवेदनातून सुचित करण्यात आले आहे.

कार्यकर्त्यांना आवाहन
केंद्र सरकारच्या फॅसिस्ट वाटचालीला लगाम घालण्यासाठी, 27 सप्टेंबर 2021 रोजीचा भारत बंद प्रचंड प्रमाणात यशस्वी करणे, सर्व देशप्रेमी नागरिकांचे प्रथम कर्तव्य आणि गांभीर्यपूर्वक जबाबदारी आहे, अशी भारतीय शेतकरी कामगार पक्षाची भूमिका आहे आणि म्हणूनच भारतीय शेतकरी कामगार पक्ष देशातील सर्व देशप्रेमी जनतेला या ङ्गभारत बंदफ मध्ये उत्स्फुर्त साथ करण्याचे आवाहन करीत असून, पक्षाच्या सर्व जिल्हा, तालुका व गांव पातळीवरील पक्ष संघटनांना तसेच जनसंघटनांतील कार्यकर्त्यांना, सर्वसामान्य जनतेला संघटित करून 27 सप्टेंबरच्या भारत बंदफ मध्ये सक्रिय भागीदारी करून हे आंदोलन यशस्वी करा! असे आवाहन कोरडे यांनी शेकापतर्फे केलेले आहे.

Exit mobile version