कथा स्पर्धेसाठी आवाहन

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

कथाकार जयंत पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेच्यावतीने जयंत पवार स्मृती कथा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यापैकी पहिल्या पाच कथा प्रसिद्धीयोग्य असल्यास त्या मराठील महत्वाच्या वाड:मयीन नियतकालकामधून प्रसिद्ध केल्या जातील. तसेच स्पर्धेतील दहा कथा गुणवत्तापूर्ण असल्यास त्या कथांचा स्वतंत्र कथासंग्रह प्रसिद्ध करण्यात येईल. अर्थात हा निर्णय परीक्षकांवर अवलंबून असेल.

कथा स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही किंवा वयाची अट नाही. कथा स्वलिखीत स्वतंत्र असावी, ती अनुवादित नसावी. कथेसाठी शब्दसंख्येचे बंधन नाही. स्पर्धेत सहभागी होणार्‍या लेखकांनी आपला पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर देणे अपेक्षित आहे. स्पर्धेतील विजेत्या कथाकाराला स्वतः उपस्थित राहून पारितोषिक स्वीकारणे बंधनकारक असेल. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल, त्यात संस्था पदाधिकारी हस्तक्षेप करणार नाहीत. कथा 31 मे पर्यंत vrsatam1979gmail.com या मेलवर विष स्वरूपात पाठवावी किंवा वैभव रामचंद्र साटम, प्रमुख कार्यवाह, समाज साहित्य प्रतिष्ठान, 101 राजदीप को ऑप. हाउसिंग सोसायटी आशा हॉस्पिटल समोर, सेक्टर 4 ऐरोली, नवी मुंबई 400708 या पत्त्यावर पाठवाव्यात. स्पर्धेबाबत काही शंका असल्यास 9821710745 या क्रमांकावर दुपारी 2 नंतर संपर्क साधावा.

Exit mobile version