केंम्ब्रिजतर्फे दिवाळी कलेक्शनवर आकर्षक ऑफर्स

| अलिबाग | प्रतिनिधी |

महाराष्ट्रातील फॅशन ब्रँड केंम्ब्रिज या दिवाळीला खऱ्या अर्थाने मूड बनविणार आहे. नव्या युगातील फॅशन आणि ट्रेंड्सवर आधारित विविध वस्त्रांची निर्मिती हे केंम्ब्रिजचे प्रमुख वैशिष्ट्‌‍य आहे. खास दिवाळीसाठी केंम्ब्रिजने शर्ट व ट्राऊजर्सची दोन नवीन कलेक्शन्स सादर केलेली आहेत. यामधील बांबू कलेक्शन म्हणजे बांबूच्या तंतूपासून बनविलेले शर्ट्स तुमचा रूबाब वाढविणारे आहेत. या शर्ट्सची किंमतही कमी असून केवळ रू. 999 पासून पुढे या किंमतीमध्ये आपल्या सर्वांना हे नावीन्यपूर्ण शर्ट्स खरेदी करता येणार आहेत. त्याचप्रमाणे फोर वे स्ट्रेच ट्राऊजर्सही तुम्हांला एक आकर्षक लूक देणाऱ्या आहेत. या ट्राऊजर्सची किंमतही अगदी रू 1399 पासून पुढे आहे. तसेच आजच्या फॅशन युगाला साजेशा ट्राऊजर्स, जीन्स तसेच शर्ट्स, डेनिम शर्ट्स, टी-शर्ट्स, ब्लेझर्स, एथनिकची देखील भव्य श्रेणी इथे तुम्हांला पाहायला मिळणार आहे. या खरेदी सोबतच तुम्हांला खास ऑफर्सही देण्यात येत आहेत. यामध्ये रू 4999 च्या खरेदीवर रू 499 च्या अक्सेसरीज मोफत तर रू 7999 च्या खरेदीवर रू 950 किंमतीचा मिल्टन लंच बॉक्स मोफत देण्यात येत आहे. तेव्हा आजच आपल्या जवळील शोरूम्सना भेट द्या आणि दिवाळी निमित्त केंम्ब्रिज शोरूमध्ये सुरु असलेल्या आकर्षक ऑफर्सचा लाभ घ्या असे आवाहन केंम्ब्रिजद्वारे करण्यात आले आहे.

Exit mobile version