कॅमलिन कंपनी अधिकार्‍याकडून महिला कामगाराचा विनयभंग

आरोपीला पोलीस कोठडी
रसायनी | वार्ताहर |
पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी हद्दीतील चावणे जवळच्या कोकीयो कॅमलिन कंपनीतील अधिकारी दिलीप तायडे याने आपला विनयभंग केल्याची तक्रार याच कंपनीत काम करणार्‍या महिलेने रसायनी पोलिस ठाण्यात केली आहे.
याबाबत तपासानंतर कॅमलिन कंपनीच्या अधिकार्‍याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असताना त्याला अटक न झाल्याने काही सेवाभावी व राजकीय संघटनांनी अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर कॅमलीन कंपनीच्या अधिकार्‍यास मंगळवारी सायंकाळी अटक करुन आज बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले.त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version