चिरनेर | वार्ताहर |
पशुसंवर्धन विभागाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शनिवार, दि. 20 मे रोजी उरण तालुक्यात रानसई, चाणजे, वेश्वी व जासई येथे पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी अनिल धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गर्भधारणा तपासणी आणि वंध्यत्व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात गायी-म्हशींची गर्भधारणा तपासणी करण्यात आली, तसेच पशुपालकांना वंध्यत्वाविषयी मार्गदर्शन करून, जनावरांच्या आरोग्यविषयी सविस्तर माहिती दिली, तसेच दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी गीर गायींचे प्रत्येक शेतकऱ्याने पालन करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. शिबीर यशस्वी करण्यासाठी डेप्युटी डायरेक्टर श्री. काळे, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. एस.डी. डाबेराव, डॉ. भोजने, डॉ. शिंदे, डॉ. सावंत, परिचर अविनाश गोंधळी आणि परिचर प्रमोद मोकल तसेच अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.