आदिवासी न्याय अभियाना अंतर्गत शिबीर

। पाली । वार्ताहर ।

सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा, कळंब येथे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियाना अंतर्गत सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली जांभूळपाडा येथील आदिवासी कातकरी व्यक्तींना आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्ड, किसान क्रेडिट कार्ड, पीएम किसान योजनेचा लाभ, जातीचे दाखले मिळावे यासाठी शिबिर आयोजित केले होते.

शिबिरात घोडपापड, करचुंडे, दांडवाडी आदिवासी महिला व पुरुषांनी बहुसंख्यांनी हजेरी लावली होती. शिबिराला आदिवासी विकास प्रकल्प पेण अधिकारी गणेश महाडिक, मंडळ अधिकारी जांभूळपाडा एस. आर. बुरंबे, तलाठी आर. एच. बाईत, ग्रामसेवक सचिन केंद्रे, बँक ऑफ महाराष्ट्र जांभूळपाडा कृष्णा दळवी, ग्रामपंचायत सदस्य जांभूळपाडा रमेश पवार, सुशील मालुसरे हे उपस्थित होते.

Exit mobile version