| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 30 जानेवारी रोजी पार पडणार आहे. आ. बाळाराम पाटील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार असून, या पार्श्वभूमीवर चर्चा व माहिती देण्यासाठी शनिवार, (दि.7) सकाळी दहा वाजता अलिबाग-चेंढरे येथील भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका चिटणीस अनिल पाटील यांनी दिली. या सभेस पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.