उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचार सुरू

| नाशिक | वृत्तसंस्था |

नाशिक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) लढवणार अशी चर्चा आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवार जाहीर झाला नसला तरी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी प्रचार सुरू केला आहे. नाशिकची जागेवर छगन भुजबळ यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित मानली जात असताना गोडसेंनी सुरू केलेल्या प्रचाराने महायुतीतील नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, महायुतीचा हेमंत गोडसेंना नाशिकमधून विद्यमान खासदार असल्याने उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. त्यात हेमंत गोडसे यांची उमेदवारी छगन भुजबळांच्या एंट्रीने अनिश्‍चित झाली आहे. मात्र, या उमेदवारीबाबत घोळ कायम असताना हेमंत गोडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा प्रचार देखील सुरू केला आहे. गोडसे यांनी छापलेल्या प्रचार पत्रकावर इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे असा उल्लेख आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही फोटो या पत्रकावर आहे.

खासदार हेमंत गोडसे
हेमंत गोडसे यांनी प्रचाराला सुरुवात केल्याने महायुती मधील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील इच्छुकांची डोकेदुखी मात्र वाढले आहे. नाशिकच्या जागेवरील आपला दावा सोडायला तयार नसल्याने पक्षश्रेष्ठी देखील अडचणी झाले आहेत. मात्र छगन भुजबळ यांनी हेमंत गोडसे यांच्या या प्रचारावर मिश्किल प्रतिक्रिया देत त्यांनी केलेला प्रचार आमच्याच उपयोगात पडेल असा टोला लगावला.
Exit mobile version