आत्करगाव येथे एसएमएस ऑल्विन कारखाना रद्द करा

आ.जयंत पाटील यांची मागणी
मुंबई | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील आत्करगाव येथे रुग्णालयातील जैविक कचर्‍याची विल्हेवाट लावणारा एसएमएस ऑल्विन कारखाना उभारणीस ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवलेला असल्याने हा कारखाना येथे उभारला जाऊ नये,अशी मागणी शेकापचे आम.जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत केली.
या अनुषंगाने उपस्थित झालेल्या चर्चेत बोलताना आ.जयंत पाटील म्हणाले की, महानगरपालिका क्षेत्रातील हॉस्पिटलमधील जैविक कचरा आक्तरगाव येथे आणून त्याच्यावर प्रक्रिया करणारा एसएमएस ऑल्विन कारखान्याच्या जागेपासून 200 मीटर अंतरावर गाव, नदी व पाझर तलाव असल्यामुळे आत्करगाव, आडोशी, चिंचवल, टेंभेवाडी, होनाड, कुंभेवाडी येथील कुजलेल्या कचर्‍यामुळे हवा प्रदुषित होऊन दुर्गंधी पसरु शकते. तसेच नदी, तलावातील पाणी प्रदुषित होऊन ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होणार असल्याने सदर प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात येऊ नये याबाबत राज्य शासनाने ठोस कार्यवाही करावी अशीही मागणी त्यांनी केली.

Exit mobile version