मात्र कारखान्यामुळे प्रदूषण होणार आहे का? तपासण्याची गरज
खोपोली | संतोषी म्हात्रे |
एसएमएस कारखान्याची जनसुनावणी बुधवारी होणार आहे. येण्यापूर्वीच हा कारखाना वादात सापडला आहे. या कारखान्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध होत असताना स्थानिक ग्रामस्थ आणि आरपीआयचे जिल्हा युवक अध्यक्ष नरेंद्र गायकवाड मात्र शांत होते. जनसुनावणीच्या पूर्वसंध्येला आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांनी रोखठोक भूमिका मांडत ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न असेल तर या कारखान्याला विरोध झालाच पाहिजे, मात्र या कारखान्यामुळे प्रदूषण होणार आहे का ? हे तपासण्याची गरज असल्याचे रोखठोक मत व्यक्त केले आहे.
जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करणारा एसएमएस नावाचा कारखाना आत्करगाव येथे येवू घेतलाय. या कारखान्यामुळे प्रदूषण होणार असल्याने स्थानिक ग्रामस्थ या कारखान्याला सुरुवातीपासूनच विरोध करत आहेत.कारखान्याबाबत नरेंद्र गायकवाड यांची काय भूमिका आहे याबाबत चर्चा सुरू असतानाच गायकवाड यांची काय भूमिका आहे. हे जाणून घेण्याचा प्रयत्न कृषीवलने केला आहे. सध्या तीव्र विरोध होत असला तरी एसएमएस कंपनीला सर्वानुमते आत्करगाव ग्रामपंचायतीने ना हरकत दाखला दिल्याचा खळबळजनक दावा नरेंद्र गायकवाड यांनी करीत जैविक कचर्यावर प्रक्रिया केली जाणार असल्याने प्रदूषण होणार असून आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती असल्याने ग्रामस्थांनी विरोध करत ना हरकत दाखला रद्द करावा अशी मागणी लावून धरल्याची माहिती गायकवाड यांनी देत येणार्या कारखान्याचे स्वागत केले पाहिजे, कारखाना आला तर अनेक प्रश्न निकाली निघतात एसएमएस कंपनीमुळे प्रदूषण होणार असेल तर चिंतेची बाब असल्याचे नरेंद्र गायकवाड यांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न असेल तर या कारखान्याला विरोध झालाच पाहिजे, मात्र या कारखान्यामुळे प्रदूषण होणार आहे का? हे तपासण्याची गरज असल्याचे रोखठोक मत नरेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.आमच्या मनात असंख्य प्रश्न आहेत, या कारखान्यामुळे आमच्या आरोग्यावर काय परिणाम होतील? या सर्व प्रश्नाची उत्तरं जनसुनावणीत घेणार असून ग्रामस्थांच्या आरोग्याचा विचार करून प्रशासनाने निर्णय घ्यावा या विचाराचे आपण असून उद्या जनसुनावणीत आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे नरेंद्र गायकवाड यांनी म्हटले आहे.