मुरुड ग्रामीण रुग्णालयात परिचरिकांच्या नेमणूका रद्द

। मुरुड । वार्ताहर ।
राज्यामध्ये मार्च 2020 पासून कोव्हिड 19 चा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात सर्वत्र कोव्हिड साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनातर्फे कोव्हिड-19 ECRP-1 अंतर्गत मनुष्यबळ मंजूर करण्यात आले होते, त्या अनुषंगाने मुरुड ग्रामीण रुग्णालयात तीन परिचारिकांची भर्ती करण्यात आली होती. परंतु सध्याच्या कोरोनाच्या येणार्‍या संभाव्य तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी केंद्र शासनातर्फे कोव्हिड -19 ECRP-2 बजेट अंतर्गत मनुष्यबळाकरिता लागणार निधी मंजूर करण्यात आलेला नसल्याने भर्ती करण्यात आली.
तीन परिचारिकेंच्या नेमणुका रद्द करण्यात आल्याने कामाचा प्रचंड ताण वाढला आहे.सध्या मुरुड ग्रामीण रुग्णालयात एक कायमस्वरूपी स्टाफ नर्स व एक डेप्युटेशनवर नर्स एवढाच नर्सिंग स्टाफ आहे, गणेशोत्सव सण साजरा करण्यासाठी बरेचसे चाकरमानी तालुक्यात येत असतात त्यामुळे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका आहेच तसेच रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावर लसीकरणही सुरू आहे.त्यामुळे येथे स्टाफ कमी पडत आहे, कोरोनाचा संसर्ग वाढलेल्या काळात झटून काम केलेल्या परिचारीकांवर पद रद्द केल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे संभाव्य कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठी तसेच रुग्णालयातील कर्मचार्‍याच्या कमी असलेल्या संख्येमुळे पडत असलेला कामाचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी त्वरित भर्ती प्रक्रिया करावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.

Exit mobile version