उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क

। अलिबाग । प्रतिनिधी।

अलिबाग नगरपरिषदेच्या मतदानाला आज सकाळी 7:30 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. यावेळी मतदान करण्यासाठी मतदानकेंद्राच्या परिसरात मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. महाविकास आघाडी शेकाप, काँग्रेसच्या उमेदवारांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे. अलिबाग येथील प्रभाग क्र. 7 मधील नगरसेवकपदाच्या उमेदवार ॲड. मानसी म्हात्रे व अभय म्हामुणकर, प्रभाग क्र.9 मधील सागर शिवनाथ भगत, प्रभाग क्र. 10 मधील शैला शेषनाथ भगत, प्रभाग क्र. 6 मधील अश्विनी ठोसर यांनीदेखील यावेळी मतदानाचे कर्तव्य पार पाडले.

Exit mobile version