। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
15 वर्षे प्रशासक असलेल्या तालुक्यातील नवगाव
ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. येथे 84 टक्के मतदान झाले आहे.
नवगाव मध्ये एकूण चार प्रभागात ही निवडणूक लढली जात आहे. थेट सरपंच पदासाठी शेकापचे अंकिता जैतू यांच्यासह दोन उमेदवार रिंगणात असून 11 सदस्यांसाठी 22 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत.
एकूण 3 हजार 130 मतदार आहेत. त्यापैकी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 2 हजार 629 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
प्रभाग क्रमांक एक मध्ये 724 पैकी 597 जणांनी मतदान केले. प्रभाग क्रमांक दोन मध्ये 730 पैकी 613 मतदान झाले. प्रभाग क्रमांक तीन मध्ये 518 मतदारपैकी 424 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच सर्वाधिक मतदान प्रभाग क्रमांक चार मध्ये 85.92 टक्के झाले. येथे 1 हजार 158 मतदारांपैकी 995 जणांनी मतदान केले