कोळीवाडा, बाजारपेठेत प्रचाराचा झंझावात

मुरूडमधील महाविकास आघाडीच्या शेकाप, मनसे उमेदवारांचे स्वागत

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील शेकाप व मनसेच्या उमेदवारांनी बुधवारी सायंकाळी कोळीवाडा, बाजारपेठ परिसरात प्रचार केला. या प्रचाराचा झंझावात पहावयास मिळाला. ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह तरुण मंडळी प्रचारात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुरूडमधील महाविकास आघाडीच्या शेकाप, मनसेचे थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे मतदारांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. या प्रचारात स्वतः शेकाप प्रवक्त्या सामील झाल्याने एक वेगळा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला.


मुरूड नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड.अंकिता माळी आहेत. नगरसेवक पदाचे प्रभाग दोनमधील उमेदवार संकेत अपराध, प्रभाग तीनमधून सिध्देश सुरते, प्रभाग चारमधून अनंत म्हसळकर, रुमण्णा मजगांवकर, प्रभाग पाचमधून मनिष माळी, प्रभाग सहामधून मनिष शमा, युविका भगत, रुमण्णा मजगांवकर, अंकित गुरव, प्रभाग आठमधून प्रयास वरसोलकर, प्रभाग नऊमधून रसिका मयेकर, प्रभाग दहामधून जागम पुलेकर हे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

मुरूडमध्ये प्रचाराचा झंझावात पहावयास मिळत आहे. शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य तथा शेकाप तालुका माजी चिटणीस अनिल पाटील, फैसल उलडे, मनोहर बैले, पुरोगामी युवक संघटना तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, शैलेश खोत, मधुकर ढेबे, निशीकांत कोळसे, अमोल मिठाग्री, मनीष माळी, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अंकिता माळी, प्रयास वरसोलकर, जागन पुलेकर, किर्ती शहा, वसीम अन्वरे, शेकाप मनसेचे कार्यकर्ते आदींनी मुरूडमधील वेगवेगळ्या भागात जाऊन मतदारांची भेट घेतली.

शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी स्वतः प्रचारात सहभागी होत मतदारांसमोर जाऊन मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी मतदारांकडून उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मूरूडमध्ये प्रचार वेगात सुरु असून मतदारांकडून प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मूरूडमधील कोळीवाडा, बाजारपेठ परिसरात प्रचार बुधवारी करण्यात आला. गृहभेटीतून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण झाला.

Exit mobile version