। पनवेल । वार्ताहर ।
कळंबोली पोलीस ठाणे हद्दीत कोबिंग ऑपरेशन व ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात आले. त्यामध्ये कळंबोली पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांसह देशीबनावटीचे पिस्तुल व तलवार हस्तगत केले आहे. अरबाज शेख यांच्या ताब्यातून 30,000 रूपये किंमतीचे देशी बनावटीचे मॅगझीन असलेले स्टील धातुचे 1 पिस्तुल व 3000 रूपये किमतीची 3 पितळी जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. अश्वीन सुर्यवंशी यांचेकडुन 19 इंच लांबीची तलवार हस्तगत करण्यात आली आहे. अरमानसिंग रंधवा यांच्याकडुन एकूण 1,26000 रूपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
दागिन्यांसह पिस्तुल केले हस्तगत
