आंबेत पुलाजवळ कारचा अपघात; दोघे जखमी

| आंबेत | वार्ताहर |

पुणे येथून दापोलीकडे जात असताना दोन अज्ञात तरुणांचा आंबेत पुलाजवळ शनिवारी आंबेत येथील सावित्री पुलानजीक रात्रीच्या अंधारात अपघात घडला. वाहन क्रमांक एम.एच.14 एच.एम. 0010 (एस क्रॉस नेक्सा) कार पुणे येथून दापोली दिशेला जात असताना आंबेत चेक पोस्टच्या काही अंतरावर आंबेत सावित्री पूल बंद करण्यात आला आहे. हा मार्ग बंद करण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी टाकण्यात आलेल्या दगडांचा रात्रीच्या अंधारात सदर कार चालकास अंदाज न आल्याने थेट दगडांना ठोकत हा अपघात घडल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आली. या अपघातात चार चाकी वाहनाच मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दुसरीकडे दैव बलवत्तर म्हणून या तरुणांचा जीव वाचला.

Exit mobile version