खोपोली – कर्जत रस्त्यावर गाडीला अपघात

पर्यटक थोडक्यात बचावले

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत – खोपोली या महामार्ग रस्त्यावर पुणे येथील पर्यटकाच्या गाडीला अपघात झाला. या गाडीमधून प्रवास करणारे वाहनचालक आणि प्रवासी हे सँडविच खात प्रवास करीत होते. यावेळी त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षण कठड्यावर जावून आदळली. या अपघातात तीन पर्यटक जखमी झाले आहेत.

पुणे येथील पर्यटक माथेरान येथे पर्यटनासाठी निघाले होते. पुणे येथून पुढे खोपोली कर्जत शहापूर या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याने त्या पर्यटकांची गाडी (एमएच -12- एलव्हीं -1269) मधून तिघे जण प्रवास करीत होते. यात चालकासह दोन महिला पुणे येथून माथेरान येथे पर्यटन स्थळी जात होते. हे पर्यटक आपल्या प्रवासात गाडी मधून नाश्ता करीत येत होते. एका हातात सँडविच आणि दुसऱ्या हातात गाडीचे स्टिअरिंग असे प्रवास त्यांचा सुरू असताना त्यांची गाडी खोपोली कर्जत भागात नांगुरले येथे डाव्या बाजूला कलंडली आणि संरक्षण कठड्याला जावून धडकली. या अपघातात गाडीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले असून पर्यटनासाठी निघालेले कुटुंब गाडीमधून सुखरूप बाहेर पडल्याने मदतीसाठी आलेले ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Exit mobile version