कारचा अपघात; एकाचा मृत्यू , दोघे जखमी

| पनवेल | वार्ताहर |
पनवेल जवळील जेएनपीटी रोडवर कंटेनर चालकाच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील महिलेचा मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. कल्पतरु रिव्हर्स साईड, तक्का येथे राहणारे संजिवकुमार सिंग (वय 40) हे त्यांची मारुती कारने पनवेल जेएनपीटी रोडवर उरणकडे जात असताना सेक्टर 05 पुष्पकनगर येथे त्यांची कार आली असता एका अज्ञात कंटेनर चालकाने धोकादायकरित्या पार्क केलेल कंटेनर रस्त्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन करून अचानकपणे सुरु करुन लेन कटींग केली.

त्यामुळे पाठीमागून आलेल्या संजीव यांच्या कारची कंटेनरला जोरदार धडक बसली. या अपघातात संजिवकुमार सिंग व त्यांची 10 वर्षाची चिमुकली श्रेयषी सिंग हे गंभीर जखमी झाले आहे. तर संजीव यांची पत्नी रश्मी सिंग (वय 35) हिचा मृत्यू झाला आहे. या घटनेची पनवेल शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version